मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 18:28 IST2018-10-12T18:26:47+5:302018-10-12T18:28:34+5:30

मालेगाव मनपा कर्मचारी व कामगारांना दिवाळी सणानिमित्त पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या पदाधिकाºयांनी मनपा आयुक्त संगिता धायगुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Demand for Sanitation from Diwali for NMC employees | मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याची मागणी

मनपा कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्याची मागणी

मालेगाव : मनपा कर्मचारी व कामगारांना दिवाळी सणानिमित्त पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या पदाधिकाºयांनी मनपा आयुक्त संगिता धायगुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या वाढती महागाईनुसार दिवाळी सण साजरा करणेसाठी महानगरपालिकेच्या कर्मचाºयांना सध्या मिळत असलेले वेतन कमी पडते. कर्मचारी व कामगारांनी मोठ्या उत्साहाने दिवाळी सण साजरा करावा म्हणून पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, महानगरपालिकेच्या सर्व कर्मचारी व कामगारांनी स्वच्छ भारत अभियानात स्वच्छता, हगणदारीमुक्त, घरपट्टी, पाणीपट्टी वसुली अशी अनेक कामे केली आहेत. दिवाळी सण साजरा करण्याकरीता पंधरा हजार सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष भारत बेद यांच्यासह पदाधिकाºयांनी केली आहे.

Web Title: Demand for Sanitation from Diwali for NMC employees