शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 01:34 IST

सिन्नर : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग तसेच सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या कामांमुळे सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वारंवार मागणी करूनदेखील या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न केल्यास येत्या २६ जानेवारीपासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय शिंदे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देसायाळे : सामाजिक कार्यकर्ते आंदोलनाच्या पवित्र्यात

सिन्नर : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग तसेच सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या कामांमुळे सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वारंवार मागणी करूनदेखील या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न केल्यास येत्या २६ जानेवारीपासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय शिंदे यांनी दिला आहे.गेल्या दोन वर्षांपासून समृद्धी महामार्गाचे तर वर्षभरापासून शिर्डी महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गासाठी साहित्य तसेच गौण खनिज वाहतुकीसाठी परिसरातील दहा-बारा किलोमीटर अंतरावरील राष्ट्रीय, राज्य व जिल्हा मुख्य मार्गाचा तसेच शिवार रस्त्यांचा वापर करण्यात येत आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने या रस्त्यांवरून रात्रंदिवस धावत असल्याने या सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र तरीदेखील रस्त्याची दयनीय अवस्था दूर होत नाही. पूर्व भागातील डॉ. शिंदे यांनी तहसीलदार व जिल्हाधिकऱ्यांना निवेदन देत २६ जानेवारीपर्यंत नुकसान झालेल्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती करून देण्याची मागणी केली आहे. याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास सायाळे येथील नागेश्वर मंदिरात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बेमुदत उपोषण आंदोलन करणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.कोकाटेंना अल्टिमेटमचा विसरआमदार माणिकराव कोकाटे यांनी समृद्धी महामार्ग, शिर्डी महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार प्रतिनिधींची तसेच रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत दोन आठवड्यांचा अल्टिमेटम देत खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही प्रशासकीय स्तरावरून कार्यवाही न झाल्याने व आमदार कोकाटे यांनाही त्यांनी दिलेल्या अल्टिमेटमचा विसर पडला असल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा