युरिया खरेदीमध्ये शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 16:38 IST2020-08-06T16:36:51+5:302020-08-06T16:38:48+5:30
कवडदरा : सध्या पाऊसाने बळीराजाला साथ दिलेली आहे. शेतकºयांचे शिवार फुलल्यालं आहे. मात्र कृषी सेवा केंद्राकडुन होणारी शेतकºयांची फसवणुक कुठेतरी थांबली पाहिजे. जर युरिया मध्ये कृषी सेवा केंद्राकडुन फसवणुक होत असेल तर शेतकरी संघटना लुट होऊ देणार नाही.

युरिया खरेदीमध्ये शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी
कवडदरा : सध्या पाऊसाने बळीराजाला साथ दिलेली आहे. शेतकºयांचे शिवार फुलल्यालं आहे. मात्र कृषी सेवा केंद्राकडुन होणारी शेतकºयांची फसवणुक कुठेतरी थांबली पाहिजे. जर युरिया मध्ये कृषी सेवा केंद्राकडुन फसवणुक होत असेल तर शेतकरी संघटना लुट होऊ देणार नाही.
ज्या सेवा केंद्रात युरिया उपलब्ध होईल त्याठिकाणी संबंधित कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित पाहिजे. यामध्ये ज्या सेवाकेंद्राकडुन शेतकर्यांची फसवणुक किंवा किमती पेक्षा जास्त भावाने खते विक्र ी होईल अशा केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी कवडदरा येथील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सदस्य विवेक रोगंटे यांनी केली आहे.