जिल्हा बॅँकेतील ठेवी परत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:35 IST2019-07-14T00:05:27+5:302019-07-14T00:35:01+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक गेल्या तीन वर्षांपासून अडचणीत आली आहे. नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात बॅँकेने वाटलेले पीककर्ज वसूल होऊ शकलेले नाही. त्यामुळे नवीन पीककर्ज देण्यास बॅँक तयार नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

जिल्हा बॅँकेतील ठेवी परत करण्याची मागणी
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक गेल्या तीन वर्षांपासून अडचणीत आली आहे. नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात बॅँकेने वाटलेले पीककर्ज वसूल होऊ शकलेले नाही. त्यामुळे नवीन पीककर्ज देण्यास बॅँक तयार नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
जिल्हा बॅँकेत ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या ठेवीची रक्कम परत मिळत नसल्याने शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ येत आहे. तसेच नागरी पतसंस्थांच्या ठेवी मोठ्या प्रमाणावर बॅँकेत जमा आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकास सोसायट्यांचा व्यवहार ठप्प झाला आहे. त्यामुळे नवीन पीककर्ज देण्यास बॅँक तयार नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकºयांना पीककर्जाची आवश्यकता आहे. मात्र पीककर्ज मिळत नसल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे शासनाने शेतकरी व पतसंस्थांच्या ठेवी परत करण्याची मागणी नाशिक जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.