शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शिरवाडे ते रानवड रस्ता दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 00:31 IST

शिरवाडे वणी : शिरवाडे ते रानवड या नऊ किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत प्रलंबित असलेला महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक, वाहनचालक व अन्य प्रवासी वर्गाने केली आहे.

ठळक मुद्देशिरवाडे ते रानवड हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडून येत आहे.

शिरवाडे वणी : शिरवाडे ते रानवड या नऊ किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत प्रलंबित असलेला महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक, वाहनचालक व अन्य प्रवासी वर्गाने केली आहे.शिरवाडे ते रानवड हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडून येत आहे. तसेच परिसरातील गोरठाण, वावीमार्गे लासलगाव बाजार समितीला जोडून येतो त्यामुळे हा रस्ता अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हा रस्ता राष्‍ट्रीय महामार्गाकडे नेऊन नाशिक, मुंबई, मालेगाव, धुळे, जळगाव येथे विविध प्रकारच्या बाजार समित्यांमध्ये विक्रीला नेण्यासाठी शेतीमाल महामार्गापर्यंत शेतकऱ्यांना पाठवावा लागतो. रस्त्यावर सद्यस्थितीत मोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याने वाहन चालवताना कसरत करावी लागते. काही वेळेस वाहने चालविताना अपघात सुद्धा होतात. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे देखिल मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते,शिरवाडे ते रानवड यामधल्या रस्त्याने बस अथवा अन्य वाहनांची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थी, नागरिक व अन्य प्रवासीवर्गाला पायी अथवा दुचाकीवरून महामार्गापर्यंत जात असताना रस्त्यावरील या खड्ड्यांना सामोरे जावे लागते. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूने जागो जागी काटेरी झुडपे वाढलेली असल्यामुळे पायी चालणे कठीण होत आहे.यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्त्याच्या कडेला बऱ्याच ठिकाणी काटेरी झुडपांची व गवताची वाढ झाली आहे रस्त्यावरून ये-जा करताना या काटेरी झुडपांचा अडथळा निर्माण होत असून ते झुडपे रस्त्यावर आले आहेत. रस्ता दुरुस्ती बाबत नागरिकांनी अनेकदा प्रयत्न केले असून तरी देखील दुरुस्तीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तरी या रस्त्याची प्रशासनाने व लोकप्रतिनिधीनी पाहणी करून तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी