राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 13:53 IST2020-07-22T13:53:43+5:302020-07-22T13:53:51+5:30

पेठ - महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणाऱ्या गुजरात राष्ट्रीय महामार्गावर आंबेगण ते सावळघाट दरम्यान खड्डयांचे साम्राज्य निर्माण ...

Demand for repair of national highways | राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची मागणी

राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची मागणी

पेठ - महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणाऱ्या गुजरात राष्ट्रीय महामार्गावर आंबेगण ते सावळघाट दरम्यान खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नाशिक ते पेठ दरम्यान आंबेगण ते सावळघाट पर्यंत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता याची दुरावस्था झालेली असून अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने तहसीलदार संदिप भोसले यांना निवेदन देऊन तात्काळ रस्त्याची दुरु स्ती करण्याची मागणी केली आहे.  या प्रसंगी गिरीश गावित,जितेंद्र जाधव, शामराव गावंडे, नितीन भोये, नितीन हलकंदर, पुंडलिक सातपुते , सरपंच भाऊराव सातपुते, संदीप पाडवी आदी. कार्यकर्ते उपस्थित होते

Web Title: Demand for repair of national highways

टॅग्स :Nashikनाशिक