येवल्यातील अतिक्र मण हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 18:34 IST2018-12-20T18:34:10+5:302018-12-20T18:34:44+5:30
औरंगाबाद महामार्गालगत शहरातील विंचूर चौफुली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करून तेथील अतिक्र मण काढण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

डॉ. आंबेडकर स्मारक परिसरातील अतिक्र मण हटवण्याबाबत निवेदन देताना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, विजय घोडेराव, अजिजभाई शेख, सुनील कोपरे, राजाभाऊ कानडे, आकाश गोतिस, राजेंद्र पगारे.
येवला : औरंगाबाद महामार्गालगत शहरातील विंचूर चौफुली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करून तेथील अतिक्र मण काढण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या स्मारकाची दररोज स्वच्छता करण्याबाबत पालिका कर्मचाऱ्यांना सूचना कराव्यात. तसेच स्मारकाचे सुशोभीकरण-कॉँक्रि टीकरण करून या परिसरात पार्किंग करण्यात येणाºया वाहनांचा अडथळा दूर करावा. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहे. निवेदनप्रसंगी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, विजय घोडेराव, अजिजभाई शेख, सुनील कोपरे, राजाभाऊ कानडे, आकाश गोतिस, राजेंद्र पगारे आदी उपस्थित होते.
=
फोटो :