नदीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
By Admin | Updated: May 10, 2017 00:16 IST2017-05-10T00:16:54+5:302017-05-10T00:16:54+5:30
नाशिक : नंदिनी (नासर्डी) नदीवरील अतिक्रमण हटवून भविष्यातील नैसर्गिक आपत्तीपासून व जीवित हानीपासून वाचवावे, अशी मागणी जय बजरंग युवक प्र्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.

नदीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नंदिनी (नासर्डी) नदीवरील अतिक्रमण हटवून भविष्यातील नैसर्गिक आपत्तीपासून व जीवित हानीपासून वाचवावे, अशी मागणी जय बजरंग युवक प्र्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.गोदावरीप्रमाणेच नाशिक शहरातील महत्त्वाची नदी म्हणून नंदिनी (नासर्डी) नदीची ओळख आहे. आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने ही या नदीला महत्त्वाचे स्थान आहे. परंतु नंदिनी नदीवर रोज भराव टाकून त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे. त्यातच भर म्हणजे नाशिक महापालिकेने सीमेंटची भिंत बांधून नदीचे पात्र कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर सांडपाणी ड्रेनेजद्वारे नंदिनीत सोडल्यामुळे या नदीला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे नदीचे अतिक्रमण काढून पात्र कमी करावे, अशी मागणी जय बजरंग युवक प्रतिष्ठानने निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे. या निवेदनावर अमित कुलकर्णी, अलोक शुक्ल, सुजित कुलकर्णी, उदय सोनवणे, योगेश गांगुर्डे, पंकज भिंगारे यांंच्या स्वाक्षऱ्या आहेत.