भुईकोट किल्ला परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:30 IST2020-12-12T04:30:48+5:302020-12-12T04:30:48+5:30
------ एम.जी. मार्केटमधील उलाढाल वाढली मालेगाव : कसमादे परिसरातील मोठी बाजारपेठ म्हणून सोयगाव येथील एम. जी. मार्केट ओळखली जाते. ...

भुईकोट किल्ला परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मागणी
------
एम.जी. मार्केटमधील उलाढाल वाढली
मालेगाव : कसमादे परिसरातील मोठी बाजारपेठ म्हणून सोयगाव येथील एम. जी. मार्केट ओळखली जाते. कोरोनाकाळात मार्केट पूर्णपणे बंद होते. अनलॉकनंतर बाजारपेठ पूर्वपदावर आली आहे. दररोज या बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. किराणा व भुसार माल मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
------
मालमत्ता करातील व्याजात सूट देण्याचा स्थायीचा निर्णय
मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना आर्थिक फटका बसला आहे. मालेगावी ८० टक्के लोक झोपडपट्टीत वास्तव्यास आहे. कामगारांचे शहर असल्याने मालमत्ता करातील व्याजात सूट देण्याचा निर्णय स्थायी समितीने मंजूर केला आहे. सभापती राजाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
------
मालेगावी पोलिसांच्या गस्ती पथकात वाढ
मालेगाव : शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने गस्ती पथकाच्या संख्येत वाढ केली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांचे प्रमाण कमी करण्यासाठी खून, लूटमार, हाणामाऱ्या, प्राणघातक हल्ले, चोरटे शस्रविक्री या गुन्ह्यांकडे लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच हद्दपार व सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे.