गिरणा नदीला पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:07 IST2018-02-28T00:07:23+5:302018-02-28T00:07:23+5:30
मालेगाव : पुनंद व चणकापूर धरणातील सन २०१७ व २०१८ मधील आरक्षित पाणी गिरणा नदीला तत्काळ सोडण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

गिरणा नदीला पाणी सोडण्याची मागणी
मालेगाव : पुनंद व चणकापूर धरणातील सन २०१७ व २०१८ मधील आरक्षित पाणी गिरणा नदीला तत्काळ सोडण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना देण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव, अरुण पाटील, रत्नाकर पवार, सुभाष अहिरे, टेहेरे येथील प्रशांत शेवाळे, नितीन पोकळे आदी उपस्थित होते. चिंचावड, आघार, पाटणे, मुंगसे, टेहेरे, दाभाडी, सोयगाव, चंदनपुरी आदी गावांच्या पिण्याच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता तत्काळ पाणी सोडावे, असे निवेदनात म्हटले आहे.