महिलेचा विनयभंग करून खंडणीची मागणी; तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 01:12 IST2018-11-16T01:12:06+5:302018-11-16T01:12:21+5:30
रमजानपुरा भागात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करीत भ्रमणध्वनीवर फोटो काढून खंडणीची मागणी करणाºया तिघा जणांना रमजानपुरा पोलिसांनी अटक केली आहे.

महिलेचा विनयभंग करून खंडणीची मागणी; तिघांना अटक
मालेगाव : शहरातील रमजानपुरा भागात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करीत भ्रमणध्वनीवर फोटो काढून खंडणीची मागणी करणाºया तिघा जणांना रमजानपुरा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या नातेवाइकाने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व त्याचा मित्र इमरान अहमद निहाल अहमद हे दोघे घरात बसलेले असताना शेख इम्रान शेख नजीर ऊर्फ इमरान (१९) व त्याच्या दोघा मित्रांनी इमरान अहमद याच्या घरासमोर येऊन त्यांना मारहाण केली. तसेच त्यांनी पीडित महिलेचा विनयभंग करुन भ्रमणध्वनीने फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.
मारामारी करणाºया दोघांविरुद्ध गुन्हा
न्यायालयाच्या आवारात आर्थिक देवाण-घेवाणीवरून मारहाण करीत सार्वजनिक शांततेचा भंग करणाºया दोघा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार पीरनाईक यांनी फिर्याद दिली आहे. शेख आरीफ शेख युनुस व त्याचा मित्र आपापसात भांडण करून सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळून आले. पुढील तपास हवालदार जगताप हे करीत आहेत.