शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पीटीएकडून शिकवणी अधिनियम मसुद्यात दुरुस्ती करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 15:44 IST

खासगी शिकवणी अधिनियम 2017 हे अत्यंत जाचक अटी असलेले विधेयक असून या विधेयकात दुरुस्ती करून स्वतंत्र परिषदेला मान्यता देण्याची मागणी नाशिक जिल्हा प्रोफे शनल टीचर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपीटीएकडून शिकवणी अधिनियम मसुद्यात दुरुस्तीची मागणी सरकारने तयार केलेल्या मसुद्यात जाचक अटी खासगी क्लासेसतालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन खासगी क्लासेससाठी स्वतंत्र परिषद स्थापन करण्याची सूचना

नाशिक : खासगी शिकवणी अधिनियम 2017 हे अत्यंत जाचक अटी असलेले विधेयक असून या विधेयकात दुरुस्ती करून स्वतंत्र परिषदेला मान्यता देण्याची मागणी नाशिक जिल्हा प्रोफे शनल टीचर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याची माहिती असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जयंतमुळे, उपाध्यक्ष यशवंत बोरसे, कैलास देसले, विलास सानप, लोकेश पारख यांनी बुधवारी (दि.10) हुतात्मा स्मारक येथील पत्रकार परिषदेत दिली.महाराष्ट्र शासनाने खासगी शिकवणी वर्गाबाबात कायदा करण्याबाबत एक समिती गठीत केली केली असून या समितीच्या तीन बैठका झाल्या आहेत. यात खासगी क्लास चालकांच्या प्रतिनिधींनी क्लासचालकांसह शासन, समाज हित लक्षात घेऊन नियोजित विधेयकासंदर्भात काही सुचना केल्या आहेत. परंतु, शासनाने या सूचनांकडे दुर्लक्ष करून सरकाने अतिशय जाचक अटींसह विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. त्यामुळे खासगी क्लास चालकांना शिकवण्या घेणे कठीण होणार असल्याने सरकाने या विधेयकात दुरुस्ती करून स्वतंत्र नियंत्रण परिषद स्थापन करण्यास मान्यता द्यावी अशी मागणी क्लास चालकांनी केली आहे. वकील, डॉक्टर या सारखीच शिक्षकांसाठीही प्रोफेशनाल टिचर्स कौंसील स्थापन करून या संघटीत क्षेत्रची नोंदणी, नियंत्रण व समन्वय साधण्यासाठी मध्यस्थ म्हणून मदत घ्यावी या मागणीसोबतच दुहेरी शिक्षण, टायअप, इंटिग्रेटेड क्लासेस यावर कडक कारवाई निर्बंध आणून शिक्षण व्यवस्था निर्दोष करावी तसेच या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांना अधिकार व आदेश द्यावेत, सर्व कोचिंक क्लासेसची योग्य पण फारशा जाचक न ठरणाऱ्या अटींवर नोंदणी करून मान्यता द्यावी व या नोंदणी नुतणीकरणासाठी किमान तीन वषाची अट असावी, प्राप्तीकर जीएसटीसारखे कर असतना क्लास चालकांच्या उत्पन्नावर 5 टक्के शिक्षण कर नसावा आदि मागण्यांसह शासनाने तयार केलेल्या मसुद्यात दुरुस्ती सुचविणाऱ्या मांगण्यांचे निवेदन सोबत जोडून पीटीएतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

 

टॅग्स :Teacherशिक्षकNashikनाशिकStudentविद्यार्थी