उपजिल्हा रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 01:09 IST2021-04-13T21:46:15+5:302021-04-14T01:09:55+5:30
येवला : येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय झाले. मात्र, सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या वैद्यकीय सुविधा कोरोना सेंटरमुळे बंद झाल्याने सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

उपजिल्हा रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
येवला : येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय झाले. मात्र, सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या वैद्यकीय सुविधा कोरोना सेंटरमुळे बंद झाल्याने सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
सर्वसामान्य रुग्णांसाठी तातडीने वैद्यकीय सुविधा उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी सेनेने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचेकडे केली आहे.
३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय असताना, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय झाले, परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांसाठी सुरू असणाऱ्या इतर सर्व सोईसुविधा बंद करण्यात आल्या आहेत.
यामुळे सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आहे. प्रसूती रुग्णांना प्रसूतीसाठी सावरगाव येथे पाठवण्यात येते, असे निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनाने तातडीने सर्वसामान्यांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून न दिल्यास उपोषण आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे. निवेदनावर स्वाभिमानी सेनचे शेरूभाई मोमीन, शाकीर शेख यांच्या स्वाक्षर्या आहेत.