आधुनिक शीतगृहे उपलब्ध करून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:42 IST2017-07-19T00:42:07+5:302017-07-19T00:42:19+5:30
आधुनिक शीतगृहे उपलब्ध करून देण्याची मागणी

आधुनिक शीतगृहे उपलब्ध करून देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष, डाळींब व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आधुनिक कोल्ड स्टोरेज (शीतगृह) अधिक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभेत ३७७च्या अधिसूचनेनुसार केली.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नियम ३७७ अधिसूचनेनुसार आधुनिक कोल्ड स्टोरेज अधिक प्रमाणात कशी आवश्यकता आहे, हे खासदार चव्हाणांनी मांडले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात द्राक्ष, डाळींब व भाजीपाल्याचे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात होते. परंतु द्राक्ष, डाळींब व भाजीपाला यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणात आधुनिक कोल्ड स्टोरेज (शीतगृह) यांच्याप्रमाणे कमी आहे. त्यामुळे जिल्ह्णातील द्राक्ष, डाळींब व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी अवेळी पाऊस, वादळ, गारांचा पाऊस यामुळे शेतकरी अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यांचा हातातोंडाशी आलेला घास बेमोसमी पावसामुळे जातो. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. नाशिकसहीत महाराष्ट्रातील शेतकरी अशामुळे कर्जबाजारी होत आहेत. जिल्ह्णात आधुनिक कोल्ड स्टोरेजसाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त अनुदान दिले पाहिजे. कोल्ड स्टोरेजची साखळी मोठ्या प्रमाणात व स्वस्त दरात उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळेल, असे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले.