वीर एकलव्य स्मारकासाठी जागेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 14:24 IST2020-03-06T14:24:27+5:302020-03-06T14:24:47+5:30
देवळा : युवा भिल्ल सेनेच्या वतीने निवेदन

वीर एकलव्य स्मारकासाठी जागेची मागणी
देवळा : येथील नगरपंचायतीच्या हद्दीत वीर एकलव्य यांच्या स्मारकासाठी नगरपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीचे निवेदन देवळा तालुका युवा भिल्ल सेनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी सरपंच रघु नवरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांना दिले.
देवळा शहरात भगवान वीर एकलव्य यांचे स्मारक व्हावे अशी मागणी आदिवासी समाजबांधवांनी केली असून, यासाठी देवळा नगरपंचयातीने जागा उपलब्ध करून घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी युवा भिल्ल सेनेचे तालुका अध्यक्ष विकी सोनवणे, संघटक राजेंद्र वाघ, सुनील गांगुर्डे, सागर गांगुर्डे, सुनील वाघ, रोहित शिंदे, प्रल्हाद नवरे, विलास गांगुर्डे, दीपक पवार, काळू पवा, शरद पवार, ज्ञानेश्वर पवार, हर्षद गांगुर्डे, दिगंबर पवार, गोरख जाधव, विठोबा पवार, दिलीप पवार, गणेश वाघ, मनोज सोनवणे, विशाल माळी, संदीप पवार आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार डॉ. राहुल आहेर व मुख्याधिकारी संदीप भोळे यांनाही निवेदन देण्यात आले.