थकीत पीकविम्याची रक्कम अदा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:18 IST2021-08-28T04:18:34+5:302021-08-28T04:18:34+5:30
मालेगाव : गेल्या वर्षीची प्रलंबित पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित अदा करावी, २०२१-२२ च्या पीकविमा मंजुरीच्या बाबतीत संथ गतीने ...

थकीत पीकविम्याची रक्कम अदा करण्याची मागणी
मालेगाव : गेल्या वर्षीची प्रलंबित पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित अदा करावी, २०२१-२२ च्या पीकविमा मंजुरीच्या बाबतीत संथ गतीने चाललेल्या प्रक्रियेला चालना द्यावी, तालुक्यातील कपाशी व इतर पिकांचे नैसर्गिकपणे झालेले नुकसान लक्षात घेऊन तलाठी व कृषी सहाय्यकांकडून पाहणी करून व त्वरित पंचनामे करावेत, मागील प्रलंबित पीक नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करणे अशी मागणी दहीवाळ, कळवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रभारी तहसीलदार किशोर मराठे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
मागील २०२०-२१ वर्षासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. मात्र मागील वर्षी मका, कपासी व भुईमूग पिकाचे मोठे नुकसान होउनही शेतकरी पीकविमा संरक्षणापासून वंचित आहेत, तर यंदा सद्य:स्थितीत कपाशी पिकाचे एका एकरात १५०-२०० झाडे मृत होत आहेत. यासंदर्भात तलाठ्यांकडून व कृषी सहाय्यकांकडून त्वरित पाहाणी करून पंचनामे करून घ्यावेत व यालाच अनुसरून चालू वर्षाच्या २०२१-२२ च्या संथ गतीने चाललेल्या पीकविमा प्रक्रियेला चालना देऊन शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून लाभ मिळवून देण्यात यावा. शेतकऱ्यांचे मागील वर्षाचे पीक नुकसानभरपाईचे अनुदान वर्ग करावे, अशी मागणी प्रा. हिरालाल नरवाडे, भिका मंडळ, संदीप दिघे, रवी भोईटे, शांताराम सोनवणे, अमोल जाधव, दिलीप जगताप, राजधर वाघ, चंद्रकांत पाटील, शंकर पवार आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
-----------------
मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची रक्कम अदा करावी, या मागणीचे निवेदन प्रभारी तहसीलदार किशोर मराठे यांना देताना प्रा. हिरालाल नरवाडे, भिका मंडळ, संदीप दिघे, रवी भोईटे, शांताराम सोनवणे, अमोल जाधव, दिलीप जगताप, राजधर वाघ, चंद्रकांत पाटील, शंकर पवार आदी. (२७ मालेगाव विमा)
270821\27nsk_20_27082021_13.jpg
२७ मालेगाव विमा