ईदपूर्वी मजुरांना बाेनस अदा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:13 IST2021-05-08T04:13:45+5:302021-05-08T04:13:45+5:30
मालेगाव यंत्रमाग व्यवसायाचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात यंत्रमाग मजुरांसह इतरही विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या माेठी आहे. ...

ईदपूर्वी मजुरांना बाेनस अदा करण्याची मागणी
मालेगाव यंत्रमाग व्यवसायाचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात यंत्रमाग मजुरांसह इतरही विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या माेठी आहे. शहर मुस्लीमबहुल असल्याने रमजान ईदचे विशेष महत्त्व असते. वर्षातील सर्वांत माेठा सण म्हणून रमजान ईद साजरी हाेते. त्या अनुषंगाने यंत्रमाग कारखानदार व मालकांनी मजूर तसेच कामगारांना लवकर बाेनस अदा करावा. वर्षभर राबणाऱ्या मजुरांना बाेनसची अपेक्षा असते. दरवर्षाप्रमाणे ईदपूर्वीच बाेनस मिळाला तर मजुरांना कुटुंबासाठी खरेदी करता येईल. काेराेना महामारीमुळे यंत्रमाग व्यवसायासह अन्य उद्याेगांवर मंदीचे सावट आहे. मात्र, तेजी व मंदी सुरूच असते. सणाचे महत्त्व व मजुरांच्या भावनांचा विचार करत या वर्षी बाेनसच्या रकमेत वाढ करून ईदचा सण गाेड करावा, असे आवाहनही शेख यांनी केले आहे.