ऑक्सिमीटर, वेपोरायझरची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:14 IST2021-04-18T04:14:04+5:302021-04-18T04:14:04+5:30

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मास्क, सॅनिटायझर, वेपोरायझर याचबरोबरच काही औषधी गोळ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वस्तूंच्या ...

Demand for oximeters, vaporizers increased | ऑक्सिमीटर, वेपोरायझरची मागणी वाढली

ऑक्सिमीटर, वेपोरायझरची मागणी वाढली

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मास्क, सॅनिटायझर, वेपोरायझर याचबरोबरच काही औषधी गोळ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वस्तूंच्या विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना संकटामुळे नागरिक सतर्क झाले असून, ऑक्सिमीटर, वेपोरायझर यासारख्या वस्तू आपल्या घरातच असाव्यात, या उद्देशाने अनेक नागरिकांकडून या वस्तूंची खरेदी केली जात आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्यानंतर सॅनिटायझरची मागणी कमी झाली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून पुन्हा सॅनिटायझरच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याशिवाय शहरातील बहुसंख्य डॉक्टर शिफारस करत असलेल्या विविध औषधी गोळ्यांचीही मागणी वाढली आहे. या वस्तूंचा पुरवठा करताना पुरवठादार आणि दुकानदारांची मोठी दमछाक होत आहे. अनेक रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन लेवल वेळोवेळी तपासावी लागते तर वाफ घेणे हाही उपचार डॉक्टरांकडून सुचवला जात असल्याने वेपोरायझर आणि ऑक्सिमीटरची नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ लागली आहे.

Web Title: Demand for oximeters, vaporizers increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.