कोरोनाबधितांना पोषक आहार देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 11:26 PM2020-08-27T23:26:39+5:302020-08-28T00:43:26+5:30

मालेगाव : येथे महानगरपालिकेतर्फे मसगा महाविद्यालयात सुरू असलेल्या केंद्रात कोरोना बाधितांवर उपचार सुरू असून, रुग्णांना पोषक आहार व काढा दिला जात नसल्याची तक्रार भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन पोफळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Demand for nutritious food for corona | कोरोनाबधितांना पोषक आहार देण्याची मागणी

कोरोनाबधितांना पोषक आहार देण्याची मागणी

Next
ठळक मुद्देपिण्याचे पाणी, एक वेळेचा नास्ता, दोन वेळेचे जेवण दिले जाते

मालेगाव : येथे महानगरपालिकेतर्फे मसगा महाविद्यालयात सुरू असलेल्या केंद्रात कोरोना बाधितांवर उपचार सुरू असून, रुग्णांना पोषक आहार व काढा दिला जात नसल्याची तक्रार भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन पोफळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
मसगा महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांना योग्य आहार व पिण्यासाठी गरम पाणी, चहा, दूध तसेच प्रोटीनयुक्त आहार व आयुर्वेदिक काढा देणे गरजेचे आहे. महापालिकेच्या माध्यमातून फक्त पिण्याचे पाणी, एक वेळेचा नास्ता, दोन वेळेचे जेवण दिले जाते आहे.
आयुक्त व उपायुक्त यांच्याकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आलेली नाही. कुठलाही प्रकारची कार्यवाही केली गेली नाही. रुग्णांना महापालिकेकडून सकाळी संध्याकाळी चहा/दुध, प्रोटीनयुक्त इतर गोष्टी, मालेगाव काढा इत्यादी दिले जात नाही. फ्लॅश तुटले आहेत, घाणीचे साम्राज्य पसरले आहेत.

Web Title: Demand for nutritious food for corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.