वीज प्रकल्प स्थलांतरित न करण्याची मागणी
By Admin | Updated: March 24, 2016 00:07 IST2016-03-24T00:05:07+5:302016-03-24T00:07:27+5:30
वीज प्रकल्प स्थलांतरित न करण्याची मागणी

वीज प्रकल्प स्थलांतरित न करण्याची मागणी
नाशिकरोड : एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रात नव्याने उभारण्यात येणारा वीज प्रकल्प स्थलांतरित करण्यात येऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शिवराज्य पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रावर शेकडो कामगार कामाला असून विद्युत केंद्राच्या पोटव्यवसायावर हजारो कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे नव्याने उभारण्यात येणारा ६६० मेगावॅटचा प्रकल्प हा स्थलांतरित करून स्थानिक भूमिपुत्र, कामगार व मजुरांना उद्ध्वस्त करू नये याकरिता नवीन प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर शिवराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय ढिकले, जी. पी. आव्हाड, नितीन पाटील, योगेश टर्ले, आर. बी. नागरे, अजिंक्य ढिकले आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)