विद्यापीठाला मुंडे यांचे नाव देण्याची मागणी

By Admin | Updated: November 30, 2015 23:17 IST2015-11-30T23:16:50+5:302015-11-30T23:17:53+5:30

विद्यापीठाला मुंडे यांचे नाव देण्याची मागणी

The demand for the name of Munde to the university | विद्यापीठाला मुंडे यांचे नाव देण्याची मागणी

विद्यापीठाला मुंडे यांचे नाव देण्याची मागणी

नाशिक : येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला लोकनेते कै. गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. गोपीनाथ मुंडे यांचे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय कार्य बघता त्यांचे कायमस्वरूपी स्मारक व्हावे यासाठी ‘लोकनेते कै. गोपीनाथरावजी मुंडे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ’ असे नामकरण करावे, अशी मागणी करतानाच त्यांनी यासंदर्भात शासनाकडे आलेल्या मागणी प्रस्तावानुसार ३१ आॅगस्ट रोजी विद्यापीठाकडे पत्र पाठविण्यात आले होते. त्यासंदर्भात २८ आॅक्टोबर रोजी झालेल्या विद्यापीठाच्या अधिसभेत चर्चा करण्यात आली आणि सदरचा विषय राज्य शासनाच्या अखत्यारित असल्याने त्यासंदर्भात शासन घेईल त्या निर्णयाला सभागृहाची मान्यता असेल, असा ठराव करण्यात आला. या नामकरणाची घोषणा करावी, अशी मागणी मोते यांनी केली आहे.

Web Title: The demand for the name of Munde to the university