कसबे सुकेणे : प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या ओझर-सुकेणे रस्त्यावर सलग तीन दिवसांपासून अपघातांचे सञ सुरू असुन सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.कसबे सुकेणे ते ओझर रस्त्यावरील वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. सलग तीन दिवसांपासून ओणे फाटा ते कसबे सुकेणे गावापर्यंतच्या विविध अपघाती वळणे असल्याने अपघात होत आहे. सोमवारी या दरम्यान कार आण िदुचाकी यात अपघात झाला, यात तीन जण गंभीर जखमी झाले. आज मंगळवारी सुकेणे कडुन तळेगाव कडे जाणारी दुचाकी व ओझरकडुन येणा-या कार यांच्यात अपघात झाला.या अपघातातही मोटारसायकल स्वार त्याची पत्नी व मुलाला गंभीर दुखापत झाली. या रस्त्यावर बाणगंगा नदीलगतचे वळणे, उतार अपघाती असुन याठिकाणी संबधित विभागाने त्वरीत उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अपघातांचे सत्र रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 14:35 IST
कसबे सुकेणे : प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या ओझर-सुकेणे रस्त्यावर सलग तीन दिवसांपासून अपघातांचे सञ सुरू असुन सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अपघातांचे सत्र रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी
ठळक मुद्देओझर - सुकेणे रस्त्यावर वाहतुक वाढल्याने अडथळे