शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

खामखेडयातील टरबुजला परप्रांतात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 17:22 IST

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा, कोबी, टमाटे लाल व उन्हाळी कांदा या बरोबर आता खरबूज व टरबूज पीक उत्पादन घेणारे गाव म्हणून होवू लागली आहे. कारण खामखेडा येथील टरबूज, व खरबूज फळे खरेदीसाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बंधावर येऊन लागला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांचे श्रम, वेळ व पैशाची बचत होत आहे.

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता कांदा, कोबी, टमाटे लाल व उन्हाळी कांदा या बरोबर आता खरबूज व टरबूज पीक उत्पादन घेणारे गाव म्हणून होवू लागली आहे. कारण खामखेडा येथील टरबूज, व खरबूज फळे खरेदीसाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बंधावर येऊन लागला आहे.गेल्या काही वर्षा पासून आवकाळी पाऊस गारपिट आणि बदलते हवामान यामुळे कांदा, डाळीब आदी नगदी पिके धोक्यात सापडली आहेत. या परिसरातील शेतकरी डाळींब पिकांची मोठया प्रमाणात शेती करीत होता. त्याच्यातून त्याला चांगल्यापैकी उत्पादन येऊन मोठ्या प्रमाणात पैसा हाती येत असे. कांदा या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जात असे. त्याच्यातूनही शेतकऱ्यांची चागली उलाढाल होत असे. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून बेमौसमी आवकाळी पाऊस, गारपीट व बदलत्या हवामानाचा फटका त्यामुळे कांदा पिक धोक्यात आले आहे. चालु वर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन चांगल्यापैकी आले .परंतु सध्या मात्र कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा पिकावर केलेला खर्चही भरून निघत नाही.खामखेडा परिसरात उन्हाळी हंगामात मिरची किंवा टमाटे पीक घेतले जात होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कमी पाण्यात आता तरु ण शेतकरी टरबूज व खरबूज या पिकाकडे वळला आहे. उन्हाळ्यात विहिरींना कमी पाणी असते. तेव्हा आता ठिबक सिंचन व सुधारित पध्दतीचा अवलंब करून उन्हाळी हंगामात या वर्षी शेकडो शेतकरी खरबूज व टरबूज पिकाची करीत आहे. याही वर्षी शेकडो शेतकऱ्यांनी टरबूज व खरबूज पिकाची लागवड केली आहे. तेव्हा आता भरघोस उत्पादन असल्याने परप्रातिय व्यापारी आता शेतकºयाच्या बंधावर टरबूज पिकाची खरेदीसाठी येत आहे.सद्या टरबूज पिकाला सहा ते सात रु पये प्रति भाव मिळत आहे. एक टरबूज फळांचे वजन दोन ते दहा किलो पर्यत असते. तेव्हा एक टरबुजचे साधारण पंचवीस रु पये ते चाळीस रु पया मिळतात. हे टरबूज जोडण्यासाठी व गाडीत भरण्यासाठी माणसाची आवश्यकता असते. तेव्हा गावातील स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. सद्या उन्हाळताचे दिवस आहे. उन्हाळ्यात टरबूज , खरबूज किंवा काकडी शरीरासाठी फार उपयोगी असते. मार्च महिन्याचे कडक ऊन पडत आहे. बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. तेव्हा टरबुजला मोठ्या प्रमाणात मागणी असलंयाने परप्रतिय व्यापारी थेट टरबूज खरेदीसाठी शेतकºयांच्या बंधावर येऊ लागल्यामुळे शेतातच व्यवहार होवू लागल्याने शेतकºयांचे श्रम, वेळ व पैशाची बचत होत आहे.