जोगमोडी रोडवरील टपरीधारकांना न्याय देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 13:33 IST2020-12-12T13:33:21+5:302020-12-12T13:33:44+5:30
पेठ : शहरातील जोगमोडी रोडवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसलेल्या टपऱ्यांऐवजी व्यावसायिकांना कायमस्वरूपी गाळे उपलब्ध करून द्यावेत तसेच सध्या कोरोना संकटात वाढीव कराची वसुली करण्यात येऊ नये यासाठी टपरीधारकांनी थेट दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठून निवेदनाद्वारे आपली कैफीयत मांडली.

जोगमोडी रोडवरील टपरीधारकांना न्याय देण्याची मागणी
पेठ : शहरातील जोगमोडी रोडवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसलेल्या टपऱ्यांऐवजी व्यावसायिकांना कायमस्वरूपी गाळे उपलब्ध करून द्यावेत तसेच सध्या कोरोना संकटात वाढीव कराची वसुली करण्यात येऊ नये यासाठी टपरीधारकांनी थेट दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठून निवेदनाद्वारे आपली कैफीयत मांडली. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने युवा कार्याध्यक्ष गणेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली टपरीधारकांनी दिलेल्या निवेदनात पेठ नगरपंचायत कार्यक्षेत्रात जोगमोडी रोडवरील टपरीधारकांना वाढीव कराची रक्कम भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. सध्या सर्वच व्यावसायिक कोरोना संकटाचा सामना करीत असल्याने नगरपंचायत प्रशासनाने वाढीव कराची वसुली थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी टपरीधारक व्यावसायिक उपस्थित होते.