शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन योजना सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 00:23 IST

यंदा कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. कोरोनामुळे खप कमी होत असल्याने उत्पादकांसह संबंधित घटकांना त्याचा मोठा फटका बसत असल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करून निर्यातीला चालना देण्याची गरज व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देलासलगाव : उन्हाळ कांदा मातीमोल दरात विकण्याची वेळ

लासलगाव : यंदा कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. कोरोनामुळे खप कमी होत असल्याने उत्पादकांसह संबंधित घटकांना त्याचा मोठा फटका बसत असल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करून निर्यातीला चालना देण्याची गरज व्यक्त होत आहे.कांद्याचे दर गगनाला भिडल्याने केंद्राने २९ सप्टेंबर २०१९ रोजी निर्यातबंदी आणली होती. याचा फटका अनेक घटकांना बसला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत निर्यातीत ५५ टक्के घट झाली आहे. त्यामुळे देशाला १५१४ कोटींचा परकीय चलनाचा फटका बसला आहे. एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० काळात ९.९५ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात होऊन देशाला १९५३ कोटी रु पयांचे परकीय चलन मिळाले आहे.देशात आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये खरीप, लेट खरीप, रब्बी असे मिळून २२८.१९ लाख टन कांदा उत्पादन झाले होते. त्यात यंदा १० टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी केंद्राने कांदा दर स्थिर करण्यासाठी नर्यातबंदी,साठवणुकीवर मर्यादा आणल्या. तब्बल पाच महिने कांदा निर्यातबंदी राहिल्याने निर्यात ठप्प झाली होती. त्यानंतर मुबलक पुरवठा झाल्याने कांद्याचे दर कोसळण्याससुरुवात झाली. केंद्राने दरातील घसरण थांबवण्यासाठी १५ मार्च २०२०पासून निर्यातबंदी उठविली. या सर्वांचा परिणाम देशातील कांदा निर्यातीला बसला आहे.यंदाही कांद्याचे बंपर उत्पादन झाले आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय पूर्ण बंद असल्याने कांद्याचा खप कमी झाला आहे. त्यामुळे उन्हाळ कांदा कवडीमोल दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याकरिता केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करून निर्यातीला चालना देण्याची गरज आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीonionकांदा