व्यापारी हिरण हत्येप्रकरणी चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:40 IST2021-03-11T21:04:36+5:302021-03-12T00:40:08+5:30
पिंपळगाव बसवंत : श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व हत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पिंपळगाव बसवंत शहर भारतीय जनता पक्षाच्यावतीने येथील पोलीस ठाण्यास निवेदन देऊन करण्यात आली आहे.

व्यापारी हिरण हत्येप्रकरणी चौकशीची मागणी
पिंपळगाव बसवंत : श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण व हत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पिंपळगाव बसवंत शहर भारतीय जनता पक्षाच्यावतीने येथील पोलीस ठाण्यास निवेदन देऊन करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर जिल्हा श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण करून झालेल्या त्यांच्या हत्येमुळे जैन समाज बाधवांत संतापाचे वातावरण पसरले आहे. या हत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पिंपळगाव शहर भाजपच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश चिटणीस अल्पेश पारख, शहर अध्यक्ष गोविंद कुशारे, बापूसाहेब पाटील, मनोज मुथा, प्रमोद भटेवरा, राजेंद्र सोनी, सुभाष धाडीवाल, उमेश ढेपले, महेश गांधी, मदन घुमरे, आदींसह समाज बांधव उपस्थित होते.