गोंदेफाटा-सोनेवाडी रस्ता कामाच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 17:54 IST2019-11-25T17:53:23+5:302019-11-25T17:54:18+5:30
सिन्नर : तालुक्यातील गोंदे फाटा ते सोनेवाडी रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून या कामाची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

गोंदेफाटा-सोनेवाडी रस्ता कामाच्या चौकशीची मागणी
सिन्नर व अकोला या दोन तालुक्याना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असून तालुक्यातील गोंदेफाटा ते सोनेवडी रस्त्याचे काम तालुक्याच्या हद्दीपर्यंत अर्धवट सोडण्यात आले आहे. तसेच जे काम पूर्ण झाले आहे ते देखील निकृष्ट दर्जाचे आहे. रस्त्याचे काम पूर्ण करून निकृष्ट दर्जाच्या कामास जबाबदार असणाऱ्या अधिकारी व ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात केली आहे. तसेच पुढील काम ८ दिवसाच्या आत करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा संघटक तुषार कपोते, तालुका अध्यक्ष विलास सांगळे, शहर अध्यक्ष निखिल लहामगे, उपतालुका अध्यक्ष शरद घुगे, गट अध्यक्ष धनंजय बोडके, मनविसे शहर अध्यक्ष सागर बेनके, उपशहर अध्यक्ष श्रीकांत पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.