परीट समाजाला अनुसूचितमध्ये समाविष्ट करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 01:05 IST2020-09-04T22:54:20+5:302020-09-05T01:05:54+5:30
सटाणा : धोबी (परीट) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरता राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासन दखल घेत नाही. शासनाला आठवण करून देण्यासाठी महाराष्टÑ राज्य धोबी (परीट) समाज आरक्षण समिती व धोबी समाज महासंघाच्या वतीने राज्यभरातील शासकीय कार्यालयात निवेदन देण्यात आले.

सटाण्याचे नायब तहसीलदार नानासाहेब बहिरम यांना निवेदन देताना शेखर परदेशी, वामन शिंदे, तालुका अध्यक्ष प्रीतम शिंदे, योगेश मोगरे आदी.
सटाणा : धोबी (परीट) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरता राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासन दखल घेत नाही. शासनाला आठवण करून देण्यासाठी महाराष्टÑ राज्य धोबी (परीट) समाज आरक्षण समिती व धोबी समाज महासंघाच्या वतीने राज्यभरातील शासकीय कार्यालयात निवेदन देण्यात आले.
सटाणा येथे नायब तहसीलदार नानासाहेब बहिरम यांना निवेदन देण्यात आले.
राज्य शासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन समाजास न्याय देण्याची मागणी धोबी समाज संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शेखर परदेशी यांनी केले आहे. यावेळी वामन शिंदे, प्रीतम शिंदे, योगेश मोगरे, हर्षल परदेशी, विशाल खैरनार, हेमंत शिंदे, संजय खैरनार, सुनील अंतूरनेकर आदी उपस्थित होते.