केशरी शिधापत्रिकाधारकांचा समावेश प्राधान्य कुटुंबात करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:07 IST2020-08-12T22:28:12+5:302020-08-13T00:07:31+5:30

अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांचा समावेश प्राधान्य कुटुंबामध्ये करावा, अशी मागणी पंचायत समिती सभापती मनीषा महाले यांनी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Demand for inclusion of orange ration card holders in priority families | केशरी शिधापत्रिकाधारकांचा समावेश प्राधान्य कुटुंबात करण्याची मागणी

सुरगाणा तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना प्राधान्य कुटुंबात समावेश करण्याच्या मागणीचे निवेदन देताना सभापती मनीषा महाले व सामाजिक कार्यकर्ते.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाताला काम नसल्याने जनतेची उपासमार

लोकमत न्यूज नेटवर्क
अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांचा समावेश प्राधान्य कुटुंबामध्ये करावा, अशी मागणी पंचायत समिती सभापती मनीषा महाले यांनी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील सुमारे दहा हजार व्यक्तींचा समावेश अंत्योदय प्राधान्य कुटुंबामध्ये जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी करून रेशनिंग धान्याचा लाभ देण्यात यावा. आदिवासी भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाताला काम नसल्याने जनतेची उपासमार होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन या परिस्थितीत गोरगरिबांची मजुरीविना होणारी उपासमार टाळावी. यासाठी शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत प्राधान्य कुटुंबाचा लाभ देण्यासाठी याची कायर्वाही तात्काळ प्रभावाने करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी सरपंच मेनका पवार, भारती चौधरी, रतन चौधरी, योगेश जाधव, अशोक धूम, त्र्यंबक ठेपणे, देवीदास हाडळ, राहुल गवळी, नितीन पवार, पोलीसपाटील परशराम चौधरी आदींनी निवेदनातून मागणी केली आहे.

Web Title: Demand for inclusion of orange ration card holders in priority families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.