मालेगावचा स्मार्टसिटी योजनेत समावेश करण्याची मागणी
By Admin | Updated: June 10, 2015 22:24 IST2015-06-10T22:24:09+5:302015-06-10T22:24:32+5:30
मालेगावचा स्मार्टसिटी योजनेत समावेश करण्याची मागणी

मालेगावचा स्मार्टसिटी योजनेत समावेश करण्याची मागणी
मालेगाव : शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करावा व येथील यंत्रमाग व्यवसायातील अडचणींसह विविध मागण्यासंदर्भात आमदार आसिफ शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची
भेट घेऊन चर्चा करून
आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
मालेगाव शहरासह राज्यातील भिवंडी, धुळे आदि ठिकाणच्या यंत्रमाग व्यवसायावर सध्या मंदीचे सावट आहे.
राजस्थानातील पाली, बालोत्रा येथील सूतप्रक्रिया उद्योग सध्या पर्यावरण नियमांच्या उल्लंघनाच्या कारणावरून तेथील न्यायालयीन आदेशामुळे बंद आहे. त्यामुळे यासंदर्भात महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांनी राजस्थान सरकारशी चर्चा करून या समस्येवर तोडगा काढावा व राज्यातील यंत्रमाग उद्योगावरील मंदी दूर करावी, अशी मागणी आमदार शेख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)केंद्र शासनाने देशभरात शंभर स्मार्टसिटीची घोषणा केली आहे. मालेगाव हे मुस्लीम बहुल शहर आहे. त्यामुळे या शहराचाही केंद्र शासनाच्या स्मार्टसिटी योजनेत समावेश करावा, त्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे आग्रह करावा, अशी मागणी शेख यांनी केली. लवकरच रमजानचा महिना सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात संपूर्ण रमजानचा महिनाभर विजेचे भारनियमन बंद ठेवण्यात यावे. तसेच शहराची संवेदनशिलता व यापूर्वी शहरात झालेले दोन बॉम्बस्फोट लक्षात घेता शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.