उपकेंद्रानुसार लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 19:37 IST2021-04-27T19:37:03+5:302021-04-27T19:37:39+5:30
ब्राह्मणगाव : ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण संख्या पाहता आरोग्य खात्याने यापुढे उपकेंद्र नुसार लसीकरण केंद्र सुरू करावीत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी गर्दी कमी होऊन लसीकरण सुरळीत होणार असल्याचे सरपंच किरण अहिरे यांनी म्हटले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड टेस्टिंग, तसेच लसीकरणसाठी झालेली गर्दी.
ब्राह्मणगाव : ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण संख्या पाहता आरोग्य खात्याने यापुढे उपकेंद्र नुसार लसीकरण केंद्र सुरू करावीत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी गर्दी कमी होऊन लसीकरण सुरळीत होणार असल्याचे सरपंच किरण अहिरे यांनी म्हटले आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच ठिकाणी कोरोना टेस्टिंग, तसेच लसीकरण करण्यात येत आहे. या प्राथमिक केंद्रात वीसच्या आसपास गाव जोडली गेली असून, येथील अनेक व्यक्ती कोणी लसीकरणासाठी, तर कोणी कोरोना टेस्टिंगसाठी येत आहेत. त्यामुळे गर्दी वाढत असून फिजिकल डिस्टन्सिंग राखणे अवघड झाले आहे.
येथे गर्दी होत असल्याने उपस्थित व्यक्तींमध्ये नंबरावरून भांडणे होत असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात व आजूबाजूच्या खेड्यांमध्ये सध्या रुग्णसंख्या वाढत असल्याने त्वरित नवीन लसीकरण केंद्राचा निर्णय घ्यावा, तसेच १ मेपासून १८ वर्षांपुढील व्यक्तींना लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याने पुन्हा गर्दीत वाढ होणार असून, १ तारखेपासून उपकेंद्रानुसार लसीकरण केंद्र सुरू करून प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सरपंच अहिरे यांनी केली आहे.
लसीकरणसाठी दररोज वाढती गर्दी आहे. त्यातच टेस्टिंग वाढत आहे. ग्रामस्थांनी याठिकाणी आवश्यक तेवढे शारीरिक अंतर ठेवावे.
-डॉ. राहुल कांबळे, वैद्यकीय अधिकारी, ब्राह्मणगाव