येवला : शासनाने गोवंश हत्याबंदी लागू केली असली तरी शहरातील काही भागात अवैध कत्तल सुरू आहे. शहरात पोलीस प्रशासनाने गोवंश हत्याबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी गोप्रेमींकडून केली जात आहे.शासनाने गोवंश हत्याबंदी लागू केली तेव्हापासून शहरातील नगर परिषदेचे स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) बंद करण्यात आला आहे. असे असतांनाही शहरात अवैधपणे कत्तल सुरू असल्याचे समजते. दोन वर्षांपूर्वी तर मालेगाव विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षकांच्या पथकाने छापा मारून शहरातून सुमारे ४५ जनावरे ताब्यात घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष दिलेलेनाही. गेल्या पंधरा दिवसात शहरातून गोधनाची चोरी झाल्याने अवैध कत्तलीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. शहरातील नांदगाव रोड परिसरात सदर अवैध कत्तल सुरू असल्याची चर्चा आहे.
गो-हत्याबंदीची अंमलबजावणी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 01:10 IST
येवला : शासनाने गोवंश हत्याबंदी लागू केली असली तरी शहरातील काही भागात अवैध कत्तल सुरू आहे. शहरात पोलीस प्रशासनाने गोवंश हत्याबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी गोप्रेमींकडून केली जात आहे.
गो-हत्याबंदीची अंमलबजावणी करण्याची मागणी
ठळक मुद्देअवैध कत्तल सुरू असल्याची चर्चा आहे.