अत्याचार करणाऱ्याला फाशी देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:09 IST2018-09-25T23:47:55+5:302018-09-26T00:09:51+5:30
अहमदनगर शहरातील तोफखाना भागात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधमास व त्याला पाठीशी घालणा-यांना फाशी द्यावी या मागणीसाठी विशेष मागास प्रवर्ग महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

अत्याचार करणाऱ्याला फाशी देण्याची मागणी
नाशिक : अहमदनगर शहरातील तोफखाना भागात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधमास व त्याला पाठीशी घालणा-यांना फाशी द्यावी या मागणीसाठी विशेष मागास प्रवर्ग महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सदर खटला द्रुतगती न्यायालयात चालवावा, खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, पीडित मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च शासनाने उचलावा आणि भविष्यात तिला शासकीय नोकरीची लेखी हमी द्यावी, तिला आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत शासनाने उपलब्ध करून द्यावी, पीडित मुलीच्या कुटुंबास पूर्ण संरक्षण मिळावे आदी मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनात भाजपा द्वारका मंडलाचे सुरेश मानकर, दिलीप देवांग, शिवाजी बोंदार्डे, छाया देवांग, लक्ष्मीकांत वाघावकर, मोहन गायकवाड, सुनील साळी, गणेश एम. तांबे, गणेश अवणकर, अशोक सपाटे, रूपेश कोडम, रमेश नताळ, दिलीप मारवाडी आदींचा समावेश होता.