शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आवर्तनाने बंधारे भरून देण्याची सकल मराठा समाजाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 19:35 IST

येवला : तालुक्यातील सर्व नद्यांवरील बंधारे व तलाव चालू आवर्तनातून भरून द्यावे, अशी मागणी येथील सकल मराठा समाजाने तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यात जून महिन्याच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला होता. या पावसाच्या भरोशावर परिसरात १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी ...

येवला : तालुक्यातील सर्व नद्यांवरील बंधारे व तलाव चालू आवर्तनातून भरून द्यावे, अशी मागणी येथील सकल मराठा समाजाने तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यात जून महिन्याच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला होता. या पावसाच्या भरोशावर परिसरात १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने सर्वच पिके धोक्यात आली आहेत. पिके वाचविण्यासाठी पालखेड कालवा लाभक्षेत्रातील सर्व बंधारे, नद्या, नाल्यांना पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण तालुक्यात विहिरींना आजपावेतो पाणी उतरलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतित आहे. हजारो रु पये खर्च करून शेतीसाठी खते, बियाणे वापरले आहेत. रब्बी पिकासाठी विहिरींना पाणी उतरणे गरजेचे आहे. अनेक शेतकऱ्यांनी मागणी केली करूनही अद्यापपावेतो पूर्ण केली जात नाही. हा प्रश्न प्रलंबित असून, शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकºयांच्या संतापाचा कडेलोट होऊ नये असे ही निवेदनात म्हटले आहे. पालखेड प्रशासनाने आजवर या प्रश्नांची निव्वळ चेष्टाच केली आहे. धरणे ओव्हरफ्लो झाले असून, ओव्हरफ्लोचे पाणी नद्यांना सोडले जात आहे. त्यामुळे चालू आवर्तनातून बंधाºयांना पाणी द्यावे, त्यावर चर्चा नको तर पाणी सोडून उत्तर द्यावे. पालखेड कालवा प्रशासनाच्या संवेदना बोथट झाल्या असून, पाण्याचा शेतकºयांच्या हितासाठी वापर व्हावा. शासनाने चालू आवर्तनातून तालुक्यातील सर्व बंधारे, तलाव भरून द्यावे अन्यथा येवला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर सुदाम पडवळ, पांडुरंग शेळके, संतोष मढवई, प्रवीण निकम, हरिदास पवार, कैलास गायकवाड, सूर्यभान गायकवाड, चंद्रकांत ठोंबरे आदींच्या स्वाक्षºया आहेत. फोटो कॅप्शनयेवला तालुक्यातील सर्व नद्यांवरील बंधारे व तलाव चालू आवर्तनातून भरून द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना निवेदन देताना सुदाम पडवळ, पांडुरंग शेळके व कार्यकर्ते. (फोटो २१ येवला)

टॅग्स :DamधरणWaterपाणी