केशरी शिधापत्रिकेवर धान्य देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:53+5:302021-07-22T04:10:53+5:30

नगरसेवक सरिता सोनवणे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. नाशिक ...

Demand for grain on orange ration card | केशरी शिधापत्रिकेवर धान्य देण्याची मागणी

केशरी शिधापत्रिकेवर धान्य देण्याची मागणी

नगरसेवक सरिता सोनवणे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केशरी शिधापत्रिका देण्यात आल्या. मात्र, सदर शिधापत्रिकाधारकांना आजमितीस धान्य सुरू करण्यात आलेले नाही. अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाकडून ३० जून २०१९ पर्यंत ज्या शिधापत्रिका वितरित केलेल्या आहेत, अशाच शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ देण्यात येत असल्याबाबत सूचित केलेले आहे. सद्य:स्थितीत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांवर गदा आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे जीवन रेशन धान्यावरच अवलंबून आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने सदर शासन निर्णयास मुदतवाढ देऊन आजमितीस वितरित केलेल्या सर्व केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळण्याकामी सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Demand for grain on orange ration card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.