सिन्नर : तालुक्यात १९७२ पेक्षाही भयावह दुष्काळ असून, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यासह दुष्काळावर तातडीने उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली.राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष कैलास झगडे यांनी दुष्काळी उपाययोजना राबविण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार नितीन गवळी यांना दिले. दुष्काळ उपाययोजनांची अजूनही अंमलबजावणी नाही. मार्चपर्यंत पुरेल इतकाच चाराअसून, पशुधन वाचविण्यासाठी मंडल स्तरावर चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात, लाल कांद्याला ५० पैसे ते ३.५० रुपये प्रतिकिलो दर मिळत असून, किमान दोन हजार रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी व्हावी, मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा करावा, रोजगार हमीची प्रभावी अंमलबजावणी करावी. जेणेकरून मजुरांचे स्थलांतर होणार नाही. उपाययोजनांची अंमलबजावणी न झाल्यास तहसील कार्यालयाच्या आवारात मुलाबाळांसह बिºहाड मांडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.यावेळी प्रमोद सांगळे, प्रवीण जगताप, निवृत्ती पवार, सुनीलगोर्डे, संदीप भालेराव, मुक्तारपिंजारी, संतोष कदम, जयरामशिंदे, तानाजी सानप, महेश गुंबाडे, कैलास वाघ, युनूस शेख, बाबाजी शेळके, रामराव आरोटे आदी उपस्थित होते.
चारा छावण्या सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 18:42 IST