जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 17:49 IST2018-11-18T17:49:22+5:302018-11-18T17:49:35+5:30
सिन्नर : तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी
सिन्नर : तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदार नितीन गवळी यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक गावांना प्रतिमाणशी २० लिटरप्रमाणे पाणी टॅँकरने देण्यात येते. मात्र, हे पाणी पुरसे नसल्याने वाढीव स्वरूपात पाणी मिळावे. जनावरांसाठी पाणी उपलब्ध व्हावे, तसेच चारा छावण्या सुरू करण्याची मागणी भाबड यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी दत्तात्रय सोनवणे, भागवत तांबे, दत्तू तांबे, दगू तांबे, संजय सांगळे, कैलास तांबे,अशोक काळे, मोहन काकड, रामदास आव्हाड,भाऊसाहेब आंधळे आदी उपस्थित होते.