कष्टकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:09 IST2020-09-12T22:15:31+5:302020-09-13T00:09:56+5:30
येवला : शासनाने मोलमजुरी करणाºया कष्टकरी नागरिकांना तातडीने तीन हजार रुपयांचे अर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम महासंघ व स्वाभीमानी सेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.

कष्टकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची मागणी
येवला : शासनाने मोलमजुरी करणाºया कष्टकरी नागरिकांना तातडीने तीन हजार रुपयांचे अर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम महासंघ व स्वाभीमानी सेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.
कोरोना काळातील लॉकडाऊनने मोलमजुरी करणाºया कष्टकरी, हातावर पोट असणा?र्यांचे जगण्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. छोटे व्यवसायीकही यातून सुटलेले नाही. या कुटुंबाना किमान उदरनिर्वाहासाठी प्रती महिना तीन हजार रूपयंचे अर्थसहाय्य शासनाने द्यावे, याबरोबरच सवर्सामान्य कष्टकऱ्यांना कोरोना काळातील वीज बिल माफ करावे, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आदींची करमाफी द्यावी असे सदर निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष शेरूभाई मोमीन, धमर्राज अलगट, सोमनाथ रोकडे, कचरू जानराव, अविनाशगिरी गोसावी, शेख मकसूद, समीर सय्यद, समीर मन्सुरी, राजू शेख, वसीम अन्सारी, सलीम सय्यद, इक्बाल अन्सारी, संदीप पगारे, संतोष गायकवाड, राजेंद्र गायकवाड, गौतम लाठे, आकाश साबळे, गणेश खळे आदींच्या स्वाक्षºया आहेत.