केंद्रीय आरोग्य सेवक कायदा लागू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:11 IST2021-06-20T04:11:53+5:302021-06-20T04:11:53+5:30
सिन्नर : डॉक्टर, आरोग्य सेवक आणि रुग्णालयांवर वाढत्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने केंद्रीय आरोग्य सेवक रक्षक कायदा ...

केंद्रीय आरोग्य सेवक कायदा लागू करण्याची मागणी
सिन्नर : डॉक्टर, आरोग्य सेवक आणि रुग्णालयांवर वाढत्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने केंद्रीय आरोग्य सेवक रक्षक कायदा लागू करावा, या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सिन्नर शाखेच्यावतीने शासकीय आणि खासगी डॉक्टरांनी शुक्रवारी (दि. १८) दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज केले.
उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. वर्षा लहाडे, आयएमए सिन्नर शाखेचे अध्यक्ष डॉ. डी. एम. गडाख, सचिव डॉ. दीपक आव्हाड, खजिनदार डॉ. अभिजित सदगीर, डॉ. भरत गारे, डॉ. विजय लोहरकर, डॉ. भूषण साळुंखे, डॉ. संदीप मोरे, डॉ. सुशील पवार आदींच्या उपस्थितीत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
वाढते हल्ले रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य सेवक रक्षक कायदा लागू करावा या मागणीसाठी आयएमए संघटनेच्यावतीने राष्ट्रीय मागणी दिवस पाळण्यात आला. डॉक्टरांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी कायदा करावा या मागणीसाठी वारंवार आंदोलने आणि निषेध दिन पाळण्यात आला. मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही. कोरोना महामारीच्या काळात देशभरातील डॉक्टरांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम केले, असे असतानाही या काळात डॉक्टर आणि रुग्णालयांवर होणारे हल्ले हे मानवजातीला काळिमा फासणारे आहे, असे यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
फोटो - १९ सिन्नर आरोग्य रक्षक
सिन्नर येथे केंद्रीय आरोग्य सेवक रक्षक कायदा लागू करावा या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे यांना देताना अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, आयएमए सिन्नर ब्रांचचे अध्यक्ष डॉ. डी. एम. गडाख, डॉ. दीपक आव्हाड, डॉ. भरत गारे, डॉ. विजय लोहरकर आदी.
===Photopath===
190621\19nsk_26_19062021_13.jpg
===Caption===
फोटो - १९ सिन्नर आरोग्य रक्षक सिन्नर येथे केंद्रीय आरोग्य सेवक रक्षक कायदा लागू करावा या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे यांना देताना अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, आयएमए सिन्नर ब्रांचचे अध्यक्ष डॉ. डी. एम. गडाख, डॉ. दीपक आव्हाड, डॉ. भरत गारे, डॉ. विजय लोहरकर आदी.