ऑनलाइन परीक्षा शुल्कात सवलत देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:15+5:302021-06-26T04:11:15+5:30
सिन्नर : विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा शुल्कात सवलत द्यावी, अशी मागणी ‘प्रहार’च्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सावित्रीबाई फुले पुणे ...

ऑनलाइन परीक्षा शुल्कात सवलत देण्याची मागणी
सिन्नर : विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा शुल्कात सवलत द्यावी, अशी मागणी ‘प्रहार’च्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांना सिन्नर तालुका प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सूरज सानप व प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष सुनील गर्जे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. कोरोना महामारी काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठांनी सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. या परीक्षा गुणवत्तापूर्ण होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रबळ होण्याची गरज विद्यापीठाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. परीक्षा शुल्कात सवलत दिलेली नाही. ऑफलाइन परीक्षांचा खर्च ऑनलाइनपेक्षा पाचपटीने जास्त असतो, असे निदर्शनास आले आहे. एकूण परीक्षा शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात यावी, शुल्क परतावा करावा, या काळात तरी विद्यापीठाने लूट थांबवावी, अशी ‘प्रहार’ने केली आहे.
---------------------------
‘कोरोनामुळे अनेक कुटुंबीयांची आर्थिक क्षमता ढासळली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या शुल्कासह परीक्षा शुल्कदेखील भरणे कठीण झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे. - सूरज सानप, तालुकाध्यक्ष, प्रहार विद्यार्थी