पांडाणे गारपीटग्रस्तांना पंचनाम्याची मागणी
By Admin | Updated: May 13, 2014 23:39 IST2014-05-13T21:50:24+5:302014-05-13T23:39:29+5:30
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अंबानेर व पांडाणे शिवारांतील गारपीटग्रस्तांना नुकसानीची अद्याप भरपाई मिळाली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त यादीची प्रतीक्षा कायम आहे.

पांडाणे गारपीटग्रस्तांना पंचनाम्याची मागणी
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अंबानेर व पांडाणे शिवारांतील गारपीटग्रस्तांना नुकसानीची अद्याप भरपाई मिळाली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त यादीची प्रतीक्षा कायम आहे.
पांडाणे, अंबानेर शिवारात गेल्या तीन महिन्यांत गारपीट झाली. त्यावेळी कृषी विभाग, महसूल विभागामार्फत पिकांचे पंचनामे करण्यात आले; परंतु नुकसान झालेल्या शेतकर्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. पांडाणे व अंबानेर शिवारांतील शेकडो एकरचे पंचनामे महसूूल यंत्रणेने केले नसल्याचे उघड होताच ग्रामस्थांनी प्रांत अधिकार्यांना घेराव घालून निवेदन दिले.
निवेदनानंतर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी फेरपंचनाम्याचे आदेश दिले. परंतु तेव्हा द्राक्ष पीक झाडावर नव्हते. वास्तविक जानेवारीत द्राक्ष पिकाचे नुकसान झाले तेव्हा झाडावर द्राक्ष होते. त्याचवेळी पंचनामे व्हायला हवे होते. नंतर पंचनाम्यास उशीर झाल्याने शेतकर्यांच्या हातात पीक नव्हते. त्यामुळे पहिल्या गारपिटीत ज्याचे नुकसान झाले तेव्हापासून सर्वच नुकसानग्रस्तांची नावे यादीत समाविष्ट करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)