कळवण तालुक्यात दिवसा वीजपुरवठ्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:21 IST2020-12-05T04:21:38+5:302020-12-05T04:21:38+5:30

कळवण : कळवण तालुक्यात सद्य:स्थितीत वीजपुरवठा हा सकाळी ७.१५ ते दुपारी ३.१५ तसेच रात्री ९.१५ ते सकाळी ७.१५ ...

Demand for daytime power supply in Kalvan taluka | कळवण तालुक्यात दिवसा वीजपुरवठ्याची मागणी

कळवण तालुक्यात दिवसा वीजपुरवठ्याची मागणी

कळवण : कळवण तालुक्यात सद्य:स्थितीत वीजपुरवठा हा सकाळी ७.१५ ते दुपारी ३.१५ तसेच रात्री ९.१५ ते सकाळी ७.१५ वाजेपर्यंत खंडित करून भारनियमन सुरू आहे. सध्या कांदा लागवड सुरू असल्यामुळे कळवण तालुक्यात वीजपुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरळीत ठेवावा, अशी मागणी कळवण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र हिरे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, तालुकाप्रमुख अंबादास जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती बळीराम देवरे, रामा पाटील, संजय रौंदळ यांच्या शिष्टमंडळाने भुसे यांची भेट घेऊन निवेदन देत कळवण तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. कळवण तालुक्यातील वीजपुरवठ्यासंदर्भात काँग्रेस व शिवसेना पदाधिकारी यांची मागणी लक्षात घेऊन महावितरणच्या यंत्रणेशी बोलून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन भुसे यांनी दिले.

निवेदनात नमूद केले आहे की, कळवण तालुक्यात कांदा हे मुख्य पीक असून, कांदा पिकाचे क्षेत्र जवळपास ४३, १०० हेक्टर इतके असून, कांदा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते व आंतरराष्ट्रीय बाजारात तालुक्यातील कांदा निर्यात केला जातो. त्यामुळे सध्या तालुक्यात कांदा पिकाची लागवड सुरू असून, त्यासाठी लागणारे मजूर हे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान उपलब्ध असतात. त्यामुळे कांदा रोपास लागवड होताना पाणी देणे आवश्यक असते. यादरम्यान वीजपुरवठा सुरळीत उपलब्ध नसल्याने कांदा लागवड करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. कांदा लागवडीचे सत्र हे १५ जानेवारीपर्यंत आहे. मागील अनेक वर्षांच्या या कालखंडात अशा स्वरुपाचे विद्युत भारनियम करण्यात आलेले नाही; परंतु सद्य:स्थितीत कळवण तालुक्यात करण्यात आलेले भारनियम रद्द करून सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

फोटो : ०४ कळवण निवेदन

कळवण तालुक्यात वीजपुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरळीत ठेवण्याच्या मागणीचे निवेदन कृषिमंत्री दादा भुसे यांना देताना महेंद्र हिरे. समवेत कारभारी आहेर, अंबादास जाधव, बळीराम देवरे, रामा पाटील, संजय रौंदळ आदी.

===Photopath===

041220\04nsk_26_04122020_13.jpg

===Caption===

कळवण तालुक्यात विद्युत पुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरळीत ठेवण्याच्या मागणीचे निवेदन कृषिमंत्री दादा भुसे यांना देतांना महेंद्र हिरे.   समवेत कारभारी आहेर, अंबादास जाधव, बळीराम देवरे, रामा पाटील, संजय रौंदळ आदी. 

Web Title: Demand for daytime power supply in Kalvan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.