कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गुळवेलाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 17:33 IST2020-09-18T17:32:15+5:302020-09-18T17:33:13+5:30
लखमापूर : नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागासह शहरातही गुळवेल (अमृतवेल) या वनस्पतीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गुळवेलाची मागणी
लखमापूर : नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागासह शहरातही गुळवेल (अमृतवेल) या वनस्पतीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
गुळवेल ही वनस्पती शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करीत असल्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक कुटुंबानी गुळवेल काढा घेण्यास पंसती दिली आहे. अनेक आजारावर हि अमृत वेल गुणकारी असल्याचे मत कुटुंबातील जाणकाराकडून बोलले जात आहे.
ग्रामीण भागात कडूनिंबाच्या झाडावर व आंब्याच्या झाडावर गुलवेल ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत कडूनिबाच्या झाडावरील गुळवेलला जास्त मागणी होत आहे. या वेलीची ओळख ग्रामीण भागातील जाणकार व्यक्तीनाच आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यापासून अनेक कुटुंब गुळवेल काढयांचे सेवन करित आहे. काहीजण या वेलीचे छोटे-छोटे तुकडे करून रात्री थोड्या पाण्यात भिजत ठेवतात व सकाळी उपाशी पोटी या पाण्याचे सेवन करतात. तर काही कुटूंब या वेलीचा काढा तयार करतात. काढा करताना भांड्यात जास्त पाणी घेवून त्यात गुळवेलाचे तुकडे टाकून उकळवून ते पाणी काही प्रमाणात आटवून त्याचा काढा तयार करुन तो सोयीप्रमाणे वापरतात. तर काही जण या गुळवेलीच्या पानाची भाजी करतात, हा एक रानभाजीचा प्रकार मानला जातो.
सध्या भेडसावत असलेल्या कोरोना संसर्गाची चिंता ही प्रत्येक नागरिकाला सतावते आहे या कोरोनाच्या भितीच्या सावटात आपण ओढले जाऊ नये यासाठी प्रत्येकजण जाणीवपुर्वक प्रयत्न करताना दिसत आहे. या चार-पाच महिन्यात ग्रामीण भागासह शहरी भागात गुळवेल, हळद, तुळस, कोरफड, निंबू, गवती चहा तसेच अनेक प्रकारच्या काढयांचे सेवन करून शिरराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
चौकट...
गुळवेलचा काढा सेवन केल्यांने ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, थंडी, मळमळ, मूळव्याध, साधेदुखी, आम्लपित्त, काविळ, पोटदुखी, मुधमेह त्याप्रमाणे गुळवेल ही डेंग्यू, चिकन गुनिया, स्वाईन फ्लूआशा प्रकारच्या अनेक आजारावर गुळवेल (अमृतवेल) गुणकारी असल्यामुळे शहरातील असंख्य कुटुंबाकडून गुळवेलाची मागणी वाढताना दिसत आहे. (फोटो १८ लखमापूर १)