माणीकनगर भाजीमार्केटला सुविधा देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:27 IST2018-12-29T00:27:26+5:302018-12-29T00:27:47+5:30
उपेंद्रनगर, माणीकनगर येथील अण्णा भाऊ साठे भाजी मार्केट येथे सुविधा उपलब्ध करून द्यावे व भाजीविक्रे त्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, या मागणीचे निवेदन काँग्रेस पक्ष व भाजी मार्केटच्या वतीने मनपा आयुक्तव अधिकारी यांना देण्यात आले.

माणीकनगर भाजीमार्केटला सुविधा देण्याची मागणी
सिडको : उपेंद्रनगर, माणीकनगर येथील अण्णा भाऊ साठे भाजी मार्केट येथे सुविधा उपलब्ध करून द्यावे व भाजीविक्रे त्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, या मागणीचे निवेदन काँग्रेस पक्ष व भाजी मार्केटच्या वतीने मनपा आयुक्तव अधिकारी यांना देण्यात आले.
काँग्रेस पक्षाचे गटनेता शाहू खैरे, वत्सला खैरे, शहराध्यक्ष शरद अहेर, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, भाजी मार्केटच्या अध्यक्ष मीरा साबळे यांच्या नेतृत्वाखाली अंजना महाले, बाबूराव खांडगे, लता जाधव, सविता मोगल, सुरेश चौधरी, त्र्यंबक भास्कर, मनीषा जमदाडे, शोभा साळवीसह शेकडो भाजीविकेता शिष्टमंडळाने मनपा आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, मनपा महासभा ठरावानुसार सिडको विभागातील माणिकनगर येथे भाजी मार्केटसाठी मंजुरी दिली आहे. सदर जागा फेरीवाला झोन म्हणून निश्चित केले आहे. याठिकाणी अनेक वर्षांपासून १०० भाजीविक्रे ते उदरनिर्वाह करत आहेत. सदर भाजीविक्रेते जागाभाडे मनपाला देत आहे. त्या ठिकाणी इमारत उभारून मार्केटच्या जागेवर उद्यान विकसित करण्याचा प्रयत्न आहे. मनपाने भाजीविक्रे त्यांना न्याय मिळवून द्यावा व मार्केट परिसरात पथदीप उभारावे, अशी मागणी भाजीविक्रे त्यांनी केली आहे.