कॉलमवर आधारीत उड्डाणपूल उभारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:34 PM2020-12-27T16:34:06+5:302020-12-27T16:34:45+5:30

घोटी : मुंबई आग्रा महामार्गावर घोटी येथे उभारण्यात येत असलेला उड्डाणपूल हा भरावावर आधारित आहे की कॉलमवर याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. भरावावर आधारीत उड्डाणपूल झाल्यास घोटी शहराचे विभाजन होऊन घोटीच्या विकासाला बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. कॉलमवर आधारीत हा उड्डाणपूल व्हावा अशी मागणी या परिसरातील व्यावसायिक व नागरिकांनी केली आहे

Demand for construction of flyovers based on columns | कॉलमवर आधारीत उड्डाणपूल उभारण्याची मागणी

खासदार हेमंत गोडसे यांना निवेदन देताना निवेदन संतोष रौदळे, मुरलीधर डहाळे, गणेश घोटकर, खंडूसिंग परदेशी, लोकेश बोरा, दत्तात्रय वाघ आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देसंभाव्य नुकसान टाळण्यासाठी घोटी ग्रामस्थांचे निवेदन

घोटी : मुंबई आग्रा महामार्गावर घोटी येथे उभारण्यात येत असलेला उड्डाणपूल हा भरावावर आधारित आहे की कॉलमवर याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. भरावावर आधारीत उड्डाणपूल झाल्यास घोटी शहराचे विभाजन होऊन घोटीच्या विकासाला बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. कॉलमवर आधारीत हा उड्डाणपूल व्हावा अशी मागणी या परिसरातील व्यावसायिक व नागरिकांनी केली आहे
                    घोटी शहरात मुंबई आग्रा महामार्गावर वेतालमाथा खिंड ते खंबाळे आश्रमशाळा या दरम्यान उड्डाणपूल होत असून या पुलाच्या प्राथमिक व पर्यायी उपाययोजनांच्या कामाला सुरुवात झाली आहे. सिन्नर चौफुली व वैतरणा फाटा येथे सर्विस रोड असणार आहे मात्र हा पूल कॉलमवर आधारित आहे की भरवाचा आहे याबाबत उलटसुलट चर्चा असून त्यामुळे या परिसरातील नागरिक व व्यावसायिक धास्तावले आहेत.

भरावावर आधारित उड्डाणपूल झाल्यास शहराचे विभाजन होऊन शहराच्या विकासाला बाधा येईल, दळणवळणला अडथळे येतील, व्ययसायिकांचे रोजगार नष्ट होतील अशी भीती व्यक्त होत आहे त्यामुळे कॉलमवर आधारित उड्डाणपूल व्हावा त्यामुळे काही प्रमाणात रोजगार टिकून राहील तसेच काही प्रमाणात व्यावसायिकांचे नुकसान टळेल. प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
याबाबत अखिल आदिवासी युवा ग्रुपचे अध्यक्ष संतोष रौदळे यांच्यासह व्यावसायिक व नागरिकांनी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण व संबंधित प्रशासनाला निवेदन दिले.

या निवेदनावर मुरलीधर डहाळे, गणेश घोटकर, खंडूसिंग परदेशी, लोकेश बोरा, दत्तात्रय वाघ, कचरू व्यवहारे, जयश्री जाधव, उत्तम काळे, किशोर कापुरे, रवींद्र गोठी, आसिफ पानसरे, पंढरीनाथ डहाळे मुकुंद वारघडे, सुनील भारती आदींच्या सह्या आहेत
 

Web Title: Demand for construction of flyovers based on columns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.