मेशीफाटा रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 18:44 IST2021-04-13T18:43:48+5:302021-04-13T18:44:28+5:30

मेशी : मेशीफाटा या चार किलोमीटर रस्त्यापैकी दोन किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम एक महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित रस्त्याचे काम रखडल्याने ह्यअसून रस्त्याची अडचण नसून खोळंबाह्ण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Demand for completion of Meshiphata road work | मेशीफाटा रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी

मेशीफाटा रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी

ठळक मुद्देया रस्त्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते.

मेशी : मेशीफाटा या चार किलोमीटर रस्त्यापैकी दोन किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम एक महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित रस्त्याचे काम रखडल्याने ह्यअसून रस्त्याची अडचण नसून खोळंबाह्ण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

या पूर्ण रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली होती. अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आल्याने अखेर काम झाले, परंतु अर्धेच त्यामुळे उर्वरित रस्ता अधिकच खराब होऊन प्रवाशांचे हाल थांबलेच नाहीत. संबंधित विभागाने रस्त्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण करावयास हवे होते, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अर्धा रस्ता चांगला आणि उर्वरित रस्ता अतिशय खराब आहे. त्यामुळे वाहानचालकांना मोठी कसरत करावी लागते.

या रस्त्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते. देवळा येथील बाजार समितीत शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी घेऊन जातात. रस्ता अतिशय खराब असल्याने अनेक वेळा वाहने नादुरुस्त होतात आणि शेतक-यांना वेळेवर शेतमाल विकण्यासाठी बाजार समितीत नेता येत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.

उर्वरित रस्त्याचेही लवकरात लवकर काम सुरू करावे, अशी मागणी मेशीच्या सरपंच सुनंदा आहिरे, उपसरपंच भिका बोरसे, माजी सरपंच केदा शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर शिरसाठ, बापू जाधव, शाहू शिरसाठ, समाधान गरूड, सुधाकर बोरसे, डोंगरगाव सरपंच दयाराम सावंत आदींनी केली आहे.

Web Title: Demand for completion of Meshiphata road work