हरणाबारी उजवा कालवा पूर्ण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 23:03 IST2020-07-01T22:22:24+5:302020-07-01T23:03:34+5:30
औंदाणे : बागलाण तालुक्यातील हरणबारी उजवा कालवा पारनेर ते सातमानेपर्यंतचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी बागलाण पंचायत समितीचे उपसभापती कान्हु अहिरे यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन देताना कान्हु अहिरे, नितीन अहिरे, अशोक अहिरे, सुनील जाधव, दिनेश देसले आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंदाणे : बागलाण तालुक्यातील हरणबारी उजवा कालवा पारनेर ते सातमानेपर्यंतचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी बागलाण पंचायत समितीचे उपसभापती कान्हु अहिरे यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बागलाण तालुक्यातील हरणबारी उजवा कालवा पारनेरपासून सातमानेपर्यंत नेण्याचे आश्वासन युती शासनाच्या काळात तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांनी दिले होते. त्या अनुषंगाने या कालव्यासाठी पाणी आरक्षणदेखील युती शासनाच्या काळात करण्यात आले होते. मात्र ही योजना अद्यापही कागदवरच आहे. हरणबारी उजवा कालवा पारनेर ते सातमानेपर्यंत पूर्णत्वास येण्यासाठी विद्यमान शासनाने तातडीने गती द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी नितीन अहिरे, अशोक अहिरे, सुनील जाधव, दिनेश देसले, अभिमन निकम आदी उपस्थित होते.