सुरगाण्यातील शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:57 IST2020-05-20T21:57:43+5:302020-05-20T23:57:33+5:30
अलंगुण : राज्यातील गत खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. राज्य शासनाच्या आदेशावरून तालुका प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केले होते.

सुरगाण्यातील शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी
अलंगुण : राज्यातील गत खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. राज्य शासनाच्या आदेशावरून तालुका प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केले होते. त्यावर राज्य शासनाने नुकसानभरपाई देण्याचे जाहीर करून अंमलबजावणीची प्रक्रिया गतिमान करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नसून ती तात्काळ शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सभापती मनीषा महाले यांनी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
खरीप पिकावर अवकाळीने नुकसान केले. सदर नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे झाले. त्यानंतर राज्य शासनाने आर्थिक मदतीची घोषणा करून मदत तातडीने देण्याचे आश्वासन राज्य शासनाने शेतकºयांना दिले होते. परंतु अजूनपर्यंत सदरची नुकसानभरपाई बाधित शेतकºयांना मिळालेली नाही. भरपाईची रक्कम शेतकºयांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी,अशी मागणी सभापती महाले यांनी तहसीलदार सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.