नुकसानभरपाईसाठी मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:31 IST2021-02-22T19:31:01+5:302021-02-22T19:31:29+5:30
पिंपळगाव बसवंत : गेल्या गुरुवारी (दि.१८) नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्याबरोबर जोरदार हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, गहू, मका, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नुकसानभरपाईसाठी मागणी
ठळक मुद्देउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपळगाव बसवंत : गेल्या गुरुवारी (दि.१८) नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्याबरोबर जोरदार हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, गहू, मका, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
निफाड तालुक्यातील रब्बीच्या पिकांसोबतच द्राक्ष शेतीला या अवकाळीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे पूर्ण करून राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.