अवैध धंदे बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:19 IST2021-09-17T04:19:07+5:302021-09-17T04:19:07+5:30

नाशिक रोड परिसरातील अवैध धंदे बंद करावेत, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नाशिकरोड पोलीस ...

Demand for closure of illegal trades | अवैध धंदे बंद करण्याची मागणी

अवैध धंदे बंद करण्याची मागणी

नाशिक रोड परिसरातील अवैध धंदे बंद करावेत, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात देण्यात आले. नाशिकरोड पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परिसरात काही ठिकाणी रोलेट फास्ट पॉइझन, मटका पत्ते, स्लो पॉइझन या सारखे अवैध धंदे सर्रास सुरू आहेत. परिसरातील अनेक तरुण या अवैध धंद्यांच्या आहारी जाऊन कर्जबाजारी झाले आहेत. त्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. तरी लवकरात लवकर हे अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नाशिकरोड अध्यक्ष

पवन कोरोटे, अगोल लोटे, विश्वास रायबोल, विजय गिते, नितीन ठाकरे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Demand for closure of illegal trades